लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या महिलांना पुढच्या महिन्यापासून मिळणार नाही १५०० रुपये यादीत नाव बघा

aditi tatkare latest news नमस्कार मित्रांनो सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत खूप फायदा झाला आहे. परंतु आता लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची तपासणी होणार आहे.तपासणी झाल्यावर ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहे त्यांना योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, आमच्याकडे अनेक अर्ज आहेत की ज्यात त्यांनी स्वतः हून अर्ज बाद करण्यास सांगितले आहे.

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात प्रचंड गाजली. विधानसभेला मिळालेलं श्रेय महायुती सरकार लाडकी बहिणीला देत आहेत. डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले असून, अर्जांची छाननी केली जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कार, नोकरी असेल तर अर्ज बाद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना, आदिती तटकरे म्हणाल्या, ‘आमच्याकडे अनेक अर्ज आल्या आहेत. ज्यात त्यांनी स्वत:हून अर्ज बाद करण्यास सांगितलं आहे. लग्र झाल्यावर स्थलांतरित, आधार कार्डचा चुकीचा नंबर समाविष्ट होणे, सरकारी नोकरी लागणे, त्यामुळे मी या योजनेस पात्र होत नाही, अशा काही अर्जात महिलांनी सांगितलं आहे. सरसकट सर्व अर्जाची छाननी करणार नाही आहोत. असंही त्या म्हणाले आहेत.

उत्पन्नामध्ये वाढ (२.५ लाख), दुचाकी, चारचाकी, आंतरजातीय विवाह, सरकारी नोकरी, आधार कार्ड आणि नावामध्ये फरक असेल आणि लक्षात आणून दिलं असेल, तर या ५ बाबींवर योग्य ती पावलं उचलू असं अदिती तटकरे म्हणालेत. बजेटची जेव्हा घोषणा झाली तेव्हा देखील अडीच कोटी महिलांना लाभ मिळेल असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे निधी वाचवणं हा विषय नाही आहे. असं अदिती तटकरे म्हणाले. त्यामुळे या निकषात जर महिला बसत नसतील तर त्यांचे अर्ज बाद होतील, असं आदिती तटकरे म्हणाले.

कुणाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही? लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्यांचे अडीच लाखांहून कमी असेल त्यांना मिळेल. ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरत असेल त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिला सरकारी कामावर रूजू आहेत, अथवा ज्यांना पेन्शन मिळत आहेत. अशा महिला देखील योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच कुटुंबातील सदस्य जर आमदार किंवा खासदार असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. असं आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं Aditi tatkare ladki bahin yojana.

Leave a Comment