₹3000 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार, लाडक्या बहिणीची संक्रांत गोड होणार

Aaditi tatkare : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकाराने प्रचंड बहुमताने

विजय मिळवला. त्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले

आहे

 

लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा

 

 

. महायुतीला निवडणुकीत मिळालेल्या यशामागे लाडक्या बहि‍णींचा मोठा वाटा आहे.

दरम्यान डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न

लाडक्या बहिणींना पडला आहे.

अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण महायुती सरकार लाडक्या

बहिणींची संक्रांत गोड करणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते

तीन हजार रुपये सक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती

सुत्रांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा

निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. जुलै

महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे

मिळत आहेत. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत ५ महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना

मिळाला आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत ७५०० रुपये जमा

झाले आहेत.

लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा

 

 

 

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार आहेत.

अशामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते (प्रत्येकी तीन हजार रुपये) दिले जातील, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.

लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा

‌‘लाडकी बहीण योजनेत तृतीय पंथीयांचा समावेश करावा‌’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. महायुतीच्या विजयात या योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते. मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये बदल केला जाणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता भाजप आमदाराने या योजनेचा लाभ तृतीय पंथीयांना देखील मिळावा अशी मागणी केली आहे. भाजपचे मध्य नागपूर विधानसभेचे आमदार प्रवीण दटके यांनी ही मागणी केली आहे. सध्या 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेंतर्गत दरमहिना 1500 रुपये दिले जातात. या योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाणार असून, रक्कमेचा पुढील हफ्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील 1500 रुपये कधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. मात्र लाडकीची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते सक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी 3000 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये.लाडकीला 3000 रू. मिळणार?

 

लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा

 

संक्रांतीआधी मिळणार 3000 रुपयेडिसेंबर-जानेवारीचे दोन्ही हप्ते मिळणारपावणेतीन कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवरसध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार लाभअपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नाहीतनव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात

 

Leave a Comment