मुलगी असेल तर मिळणार 50 हजार रुपये असा करा अर्ज January 1, 2025 by Rushi देशात मुलींच्या हितासाठी केंद्र सरकारसोबत राज्य सरकार देखील अनेक योजना राबवत आहे. मुलींची संख्या वाढवणे आणि त्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्यता करणे हा या योजनांचा हेतू असते. महाराष्ट्रात देखील मुलींसाठी शानदार स्किम सुरु आहे. माझी कन्या भाग्यश्री असं या योजनेचं नाव आहे. या योजनमध्ये मुलीच्या जन्मावर काही अटी पूर्ण केल्यास 50 हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जात आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी सुरू केली. मुलींची संख्या वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत दुसरी मुलगी असली तरी सरकार पैसे देते. केवळ महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेऊ शकतात. या अटी कराव्या लागतील पूर्ण या योजनेंतर्गत राज्यातील ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी केली, त्यानंतर त्या मुलीच्या नावावर शासनाकडून 50,000 रुपयांची रक्कम बँकेत जमा केली जाते. या योजनेंतर्गत दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन केले असेल तर नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावे 25,000-25,000 रुपये बँकेत जमा केले जातील. योजनेअंतर्गत मुलीला व्याजाचे पैसे मिळणार नाहीत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला पूर्ण रक्कम मिळेल. महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजनेचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी किमान 10वी उत्तीर्ण आणि अविवाहित असणे आवश्यक आहे. SBI vs Post Office FD: एसबीआय की पोस्ट ऑफिस? कुठे एफडी केली तर होईल जास्त फायदा? 1 लाखांचा अपघात विमा माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मिळणारी रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येऊ शकते. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँकेत जॉइंट अकाउंट उघडले जाते. यावर 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे. हे डॉक्यूमेंट्स आवश्यक -आधारकार्ड -आई किंवा बालिकेचे बँक अकाउंट पासबुक -मोबाईल नंबर -एक पासपोर्ट साइज फोटोज -निवासी प्रमाणपत्र -उत्पन्नाचा दाखला RD VS SIP: 5 हजारांची पोस्ट ऑफिस RD की SIP? 5 वर्षात कुठे मिळेल जास्त फायदा? अर्ज कसा करायचा? माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म पूर्णपणे भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जमा करा. तपासाअंती तुमचा अर्ज योग्य आढळल्यास सरकार तुम्हाला पैसे देईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा